शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर


राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून चांदा ते बांदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळाले आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात वाताहत झाली आहे. येथे कसेबसे त्यांचे नगरसेवक निवडून आले आहे. एकमेव असणारा नगराध्यक्षही शिंदेंनी पळवल्याचे समोर आले होते. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असाणारे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. त्यांनी येथे पालकमंत्री नितेश राणेंनाच होमपिचवर पाणी पाजले आहे. ज्यात त्यांची मदत आमदार निलेश राणे यांनी केली. त्यामुळे संदेश पारकर हे राज्याच्या पटलावर गेले. पण आता तेच शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे दिसत असून ठाकरेंचा दुसराही नगराध्यक्ष फुटला? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल येत असतानाच दुपारपर्यंत भाजपने शंभरी ओलांडली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अर्धशतक पार केले होते. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचेही ४० ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले होते. या तुलनेत महाविकास आघाडीची कामगिरी विधानसभेसारखीच निष्प्रभ ठरली. ठाकरे सेनेचे केवळ ८ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अशातच रायगडमधील श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अतुल चौगुले हे दणदणीत मतांनी विजयी झाल्याचे समोर आले. यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.मात्र सुनील तटकरे यांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पडद्याआडून मदत केल्याचे उघड झाले आणि अतुल चौगुले यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. गोगावले यांनी ही आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी विजयी नगराध्यक्षाची मानसिकता असून वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य केल्याने यात भर पडली होती.

दरम्यान या चर्चा थांबतात न थांबतात तोच आता तब्‍बल १७ वर्षांनंतर पुन्हा कणकवलीचे नगराध्यक्ष पदावर बाजी मारलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा बातम्या येवून थडकल्या आहेत. यामुळे शिवसेनेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.नुकताच नगराध्यक्ष झालेले पारकर यांनी मुंबईत गाठली आहे. पण त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती होती. या भेटीनंतर आता पारकर हे शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिव धनुष्य हाती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूय. तर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आता खळबळ उडाली आहे.

पारकर यांनी कणकवली शहर विकास आघाडी करून त्याचे नेतृत्व शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्याकडे दिले होते. त्यांच्या मदतीने त्यांनी भाजपला येथे सत्ता काबीज करण्यापासून रोखले. यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री नीतेश राणेंना त्यांच्याच होमपीचवर धक्का देण्यासह आव्हान निर्माण केल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button