
शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्याता पदावर तासिका पद्धतीने नियुक्ती
रत्नागिरी, दि २४ ) :- शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर अधिव्याख्याता पदांसाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील फक्त सम सत्राकरिता नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी मुलाखत गुरुवार १ जानेवारी २०२६, सकाळी ११ वाजता मुख्य इमारत व विस्तारीत इमारत संबंधित विभाग येथे होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रत यासह उपस्थित रहावे, असे प्र. प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन दि.मा. शिंदे यांनी कळविले आहे.
स्थापत्य, यंत्र, विद्युत, संगणक, मेकॅट्रॉनिक्स, उपयोजित यंत्रशास्त्र इत्यादी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक अर्हता बी.ई. प्रथम श्रेणी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक अर्हता बी. फार्म. प्रथम श्रेणी, इंग्रजीसाठी एम. ए. प्रथम श्रेणी, गणितसाठी एम. एससी. प्रथम श्रेणी, रसायनशास्त्रसाठी एम. एससी. प्रथम श्रेणी, भौतिकशास्त्रसाठी एम. एससी. प्रथम श्रेणी आहे.




