
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती
रत्नागिरी, दि २४ ) :- राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज येथील मुख्य बसस्थानकात विशेष माहितीपर ग्राहक जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, औषध निरीक्षक सोपान वाडे, अन्न सुरक्षा अधिकारी भाग्यश्री परदेशी, तृप्ती घरत, संकेत कोगेरी, ज्ञानेश्वर आटपाडकर आदी उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये अन्न व औषध उत्पादनाबाबत घ्यावयाची काळजी, फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, तक्रार नोंदणीची प्रक्रिया इत्यादी विषयांवर माहितीपर फलक लावून पत्रके वाटण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.
ग्राहकांनी अन्न व औषधे खरेदी, साठवणूक, वापर व विल्हेवाट करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच खाद्य अन्नपदार्थ औषधांबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची खरेदी करू नये, औषधे खरेदी करताना रजिस्टर फार्मासिस्टच्या उपस्थितीत योग्य ती खरेदी बिलाने खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले. प्रदर्शनामुळे ग्राहकांमध्ये जागरुकता वाढवण्यास मदत झाली असून, अशा उपक्रमांमुळे ग्राहक संरक्षण अधिक प्रभावी होईल.
तालुकास्तरावर दापोली येथे दापोली केमिस्ट असोसिएशन यांच्यामार्फत ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात आला.
यामध्ये अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सु. वि पाटील, शुभम चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी रत्नागिरी शहर बसस्थानकाचे व्यवस्थापक महेश सावंत तसेच लांजा तालुक्यातील ओजस मेडिकलचे श्री. लिमये यांचे सहकार्य लाभले.




