
किशोरी संघ कर्णधार मीरा कामतेकर, किशोर संघ कर्णधार प्रयाग नामये
रत्नागिरी जिल्ह्याचे किशोर, किशोरी संघ मुंबईला रवाना


रत्नागिरी : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर – १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे किशोरी व किशोर संघ मुंबईला रवाना झाले आहेत. किशोरी संघाच्या कर्णधार पदी मीरा कामतेकर, तर किशोर संघाचा कर्णधार प्रयाग नामये यांची निवड झाली आहे.
लांजा येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून किशोर व किशोरी संघाची निवड करण्यात आली आहे. ही निवड करण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार यांच्या निवड समितीने केली. किशोरी संघाचे प्रशिक्षण शिबिर रत्नागिरी येथे, तर किशोर संघाचे तळवडे लांजा येथे झाले. किशोरी संघाला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांनी मार्गदर्शन केले. दोन्ही संघ मुंबईला रवाना झाले असून त्यांना राज्याचे माजी सचिव संदीप तावडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
किशोरी संघ : मीरा कामतेकर (कर्णधार), स्वरा साळुखे, विधी सावंत, परी सुफल, मानवी शिगवण, विभूती मेत्री, ओवी वाडेकर, स्वरा उपशेट्ये, विधी रहाटे, मिहीका मोरे, आराध्या माने, आश्लेषा पड्ये, पौर्णिमा दरडे, सात्विका कांबळे, चैत्राली दिक्षीत. पंकज चवंडे (प्रशिक्षक), साक्षी डाफळे (संघ व्यवस्थापक).
किशोर संघ : प्रयाग नामये (कर्णधार), सोहम इंगळे, आयुष इंगळे, उमेश इंगळे, चिराग पाटोळे, श्लोक मांडवकर, पार्थ लांजेकर, यशराज कांबळे, आदित्य माटल, यश मांडवकर, गणेश खामकर (लांजा), नयन बुरटे, श्रेयस कदम (चिपळूण), शाश्वत डोर्लेकर (गुहागर), विनायक मटकर (राजापूर). चेतन सनगले (प्रशिक्षक), विजय पाटोळे (संघ व्यवस्थापक).




