
’वंदे मातरम’ लोगो डिझाईन स्पर्धेत प्रतिभावान डिझायनर ओंकार अनंत कोळेकर यांने द्वितीय क्रमांक पटकावला
रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. ’वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत, रत्नागिरीतील तरुण आणि अत्यंत प्रतिभावान डिझायनर ओंकार अनंत कोळेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावत कोकणची मान उंचावली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो कलाकार, डिझायनर्स आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, खुल्या गटातून ओंकार यांनी मिळवलेले हे यश रत्नागिरी जिह्याच्या कला आणि सर्जनशील क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचे मात्तले जात आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेमध्ये कला, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा संगम दर्शवणार्या संकल्पनांना प्राधान्य देण्यात आले होते. ओंकार कोळेकर यांनी डिझाईन केलेल्या लोगोमध्ये ’वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करणारा राष्ट्रभक्तीचा आधुनिक आविष्कार दिसून येतो. त्यांच्या लोगोमधील साधेपणा, अर्थपूर्ण प्रतिकात्मकता आणि प्रभावी व्हिज्युअल सादरीकरणामुळे मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथील नामवंत परीक्षकांनी त्याची विशेष दखल घेतली. निवड करण्यात आलेल्या लोगोचे अधिकृत अनावरण ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
www.konkantoday.com




