
माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा ”; 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकीवरील संकट टळले!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा राजकीय दिलासा देणारा ठरला आहे.
नाशिकमधील ३० वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांची आमदारकी तूर्तास सुरक्षित झाली असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आलेले मोठे संकट टळले आहे.




