
नागरिकांची गैरसोय दूर झाली, अखेर लांजात उभारले फिरते शौचालय
लांजा शहरात रस्ता रुंदीकरणाच्या कामाअंतर्गत निर्मल शौचालय तोडण्यात आल्याने गेल्या काही काळापासून नागरिकांना तीव्र गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी, प्रवासी आणि पादचारी यांच्यासाठी ही समस्या गंभीर बनली होती. या समस्येकडे एका दैनिकाने लक्ष वेधत प्रशासनाला जाब विचारला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे गटनेते संजय यादव यांनी नगरपंचायत लांजाचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा कल्ला, अखेर नगरपंचायतीने लांजा शहरात फिरते शौचालय लांजा येथे उभारण्यात आलेले फिरते शौचालय. उभारण्याचा निर्णय घेतला आणि करण्यात आली. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
www.konkantoday.com




