
ट्रॅक्टरची धडक बसल्याने एकाचा मृत्यू
आंबडवे ते मंडणगड जाणार्या रोडवर जांभळीची मळी या ठिकाणी ट्रॅक्टर नं. एमएच ४६ ए /१०८५ या ट्रॅक्टरचा चालक सुभाष लिंबाजी जाधव (रा. भिंगरोळी, मंडणगड) याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अती वेगाने व बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवून प्रकाश पांडुरंग गोरे यांना ठोकर देवून पळून गेला. या अपघातात प्रकाश गोरे (३५, रा. घोसाळे धनगरवाडी, ता. मंडणगड) यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत आरोपी सुभाष जाधव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com




