
अंत्योदय रेशनकार्ड धारकांसाठी साखर वितरण पुन्हा करण्याचा निर्णय
महाराष्ट्र शासनाने दीड वर्षाच्या खंडानंतर अंत्योदय रेशनकार्ड धारकांसाठी साखर वितरण पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार ५३५ शिधापत्रिकाधारक गरजू कुटुंबांना महिन्याला १ किलो साखर २० रुपये प्रतिकिलो दराने पुन्हा मिळणार आहे. जिल्ह्यातील १३ गोदामामध्ये २ हजार १७२ क्विंटल साखर जमा झाली आहे. प्रत्येक महिन्याला ३७६.३३ क्विंटल साखरेची गरज जिल्ह्याला आहे. सध्या साखर वाटप प्रती एक किलोप्रमाणे सुरू आहे. राज्यशासनाकडून अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखरेचे वाटप पूर्वी केले जात होते; मात्र दीड वर्षापासून साखरवाटप बंद होते. तांदूळ आणि गहू. असे धान्य प्रतिकार्ड २५ किलो मोफत दिले जात होते. आता पुन्हा प्रत्येक महिन्याला या. शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाकडून घेण्यात आला असल्याने या लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
www.konkantoday.com




