
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला आहे.तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. राज्यात महायुतीचे नगराध्यक्षपदाचे 214 उमेदवार विजयी झाले आहेत, तर महाविकास आघीडाला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे, भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, भाजपचे तब्बल 117 उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांवर असून शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 37 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं आहे,



