रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर येथे वीजखांब तुटल्याने दोघे कामगार जखमी
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर येथे विजेचे काम करत असताना सिमेंटचा खांब तुटल्याने दोघे कामगार जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
साधन बुद्धिब चौधरी (२४) व फुलचंद सुखदेव चौधरी (२३, रा. मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहे. साधन व फुलचंद चौधरी हे १८ डिसेंबर रोजी मिरजोळे हनुमाननगर येथे ३३ केव्हीची तार ताणण्याचे काम करत होते. दोघेही या कामासाठी सिमेंटच्या खांबावर चढले होते. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानक खांब तुटल्याने दोघेही खाली पडून जखमी झाले, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.www.konkantoday.com




