
रत्नागिरी नगर परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मोठा विजय
32 पैकी 29 जागा वर विजय मिळविला, आघाडीला तीन जागा
पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराचा व मतदार संघाचा केलेल्या विकास कामाला नागरिकांनी पाठिंबा म्हणून महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात मोठा विजय टाकला आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या 32 जागांपैकी 29 जागांवर उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवून महाविकास आघाडीचा धुवा उडवला आहे महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी आमदार बाळ माने यांनी केले होते त्यानी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सुनबाई शिवानी माने यांना उभे केले होते मात्र त्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले महाविकास आघाडीचे फक्त तीन उमेदवार विजयी होऊ शकले आहेत नामदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने प्रचंड विजय मिळवल्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होतात सर्वत्र जल्लोष करण्यात आला
- प्रभाग क्रमांक दहा मधून मानसी करमरकर व राजेश तोडणकर विजयी झाले
- प्रभाग क्रमांक पाच मधून महायुतीचे सौरभ मलुष्टे व पूजा पवार विजय
- मिरकर वाडा प्रभाग क्रमांक 13 मधून महायुतीच्या आफ्रीन होडेकर व सुहेल साखरकर विजयी
- प्रभाग क्रमांक सहा मधून महायुतीच्या मेघा कुलकर्णी व राजीव किर विजयी
*रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून महायुतीच्या प्रीती सुर्वे क्रमांक तीन मधून महायुतीचे राजन शेट्ये
- प्रभाग क्रमांक आठ मधून नहीदा सोलकर व महायुतीचे बाळू साळवी विजयी
- प्रभाग क्रमांक 9 महायुतीचे विजय खेडेकर व सायली पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक 11 मधून महायुतीचे समीर तिवरेकर व सुप्रिया रसाळ विजयी
- प्रभाग महायुतीचे क्रमांक 16 मधून रुक्सार खान व सोहेल मुकादम विजयी
- प्रभाग क्रमांक 15 मधून महायुतीचे वर्षा ढेकणे विजयी प्रभाग क्रमांक 15 मधून महाविकास आघाडीचे अमित विलणकर विजय
- रत्नागिरी नगर परिषद प्रभाग चार मधून महाविकास आघाडीचे केतन शेट्ये व फौजिया मुजावर विजयी झाले
- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून महायुतीचे निमेश नायर व स्मितल पावस्कर विजयी




