
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध बेकायदेशीर वाळू उपशाची गय नाहीच, जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध वाळू उपशाच्या वाढत्या तक्रारी आणि त्यामुळे होणारे नैसर्गिक नुकसान यावर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अखेर ’ऍक्शन मोड’ घेतला आहे. बेकायदेशीर वाळूमाफियांना थेट इशारा देत त्यांनी कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जिंदल यांनी संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे झालेल्या मोठ्या कारवाईची माहिती दिली. बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत तक्रार प्राप्त होताच प्रशासनाने संगमेश्वरमध्ये तत्काळ धडक कारवाई केली. सुमारे ३५ लाख रुपयांच्या मशिन्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात ांदळवनाची तोड झाल्याची तक्रार असल्याने जिल्हाधिकार्यार्यांनी या संदर्भात वनविभागालाही पत्र देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.www.konkantoday.com




