
दुचाकीवरून प्रवास करताना तोल जावून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
दुचाकीवरून प्रवास करताना तोल जावून पडलेल्या दापोली-नवानगर येथील ४१ वर्षीय महिलेचा नवी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंजुळा विश्वनाथ चव्हाण (४१, रा. नवानगर, दापोली) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास मंजुळा चव्हाण या पती विश्वनाथ चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने नवानगर येथून दापोली बाजारपेठेकडे येत होत्या. या दरम्यान त्या दुचाकीवरून घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मुंजळा बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबई-कामोठे येथील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंजुळा चव्हाण यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com
रत्नागिरी शहरालगतच्या पटवर्धनवाडी येथे विषारी द्रव प्राशन करणार्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी शहरालगतच्या पटवर्धनवाडी येथे विषारी द्रव प्राशन करणार्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक बाबू माने (३०, रा. पटवर्धनवाडी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. दीपक याने १० डिसेंबर रोजी अज्ञात कारणातून विषारी द्रव प्राशन केले. यावेळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान दीपक याचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




