
कोकण मार्गावर धावणार कोईमतूर-हरिद्वार स्पेशल
कोकण मार्गावरून धावणार्या नियमित रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. समन्वयाने कोईमतूर-हरिद्वार त्यानुसार कोईमतूर-हरिद्वार स्पेशल २४ डिसेंबर रोजी धावेल. कोईमतूर येथून सकाळी ११.१५ सुटणारी स्पेशल चौथ्या दिवशी म्हणजेच २७ डिसेंबर रोजी १२.०५ वाजता हरिद्वार येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ३० डिसेंबर राजी हरिद्वार येथून रात्री १०.३० वाजता सुटून २ जानेवारीला पहाटे ४ वाजता कोईमतूर येथे पोहोचेल. १८ एलएचबी डब्यांच्या स्पेशलला पालघाट, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कन्नूर, मंगळूर जंक्शन, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बायंदूर, कारवार, मडगाव जंक्शन, थिविम, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, वसई रोड, उधना जंक्शन, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, कोटा जंक्शन, सवाई माधोपुर मथुरा जंक्शन, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद जंक्शन आणि रुरकी स्थानकांवर थांबे आहेत.www.konkantoday.com



