
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खैर वृक्षतोडीवरील निर्बंध शिथिल करण्याचा शासनाचा निर्णय
कोकणातील शेतकर्यांच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या दृष्टीने राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ च्या तरतुदींमधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (दोडामार्ग तालुका वगळून) या दोन जिल्ह्यांतील खैर या वृक्ष प्रजातीला अटींनुसार सवलत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केली आहे.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ च्या कलम १२ द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जनहितार्थ घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे या दोन जिल्ह्यांतील स्थानिक क्षेत्रांना ऍकेशिया कॅटेच्य (खैर) या झाडाच्या बाबतीत संबंधित अधिनियमाच्या सर्व जानक तरतुदींमधून सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे येथील शेतकर्यांना आपल्या मालकीच्या जमिनीतील खैराची झाडे तोडताना कायदेशीर प्रक्रिया आणि परवानगीच्या कटकटीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com




