
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथे भरदिवसा घरफोडी सव्वा लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी, गणेशवाडी येथ एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामचंद्र झाराजी निंबरे (वय ४६, रा. कळझोंडी) यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही चोरी १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.०० वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी निंबरे हे कामानिमित्त घराबाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील १८ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅमची सोन्याची पुतळी, प्रत्येकी ४२ हजार रुपये किमतीच्या ७ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ९ हजार रुपये किंमतीची सोन्याचा मणी असलेली चांदीची माळ आणि १ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.www.konkantoday.com



