
ग्रामसेवक संतापले, विकासकामे करायची की, कुत्र्यांच्या मागे फिरायचे? उपस्थित केला सवाल
एका बाजूला शासनाच्या विविध योजना, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत विकासकामांचा ताण असतानाच जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकार्यांवर आता एक नवीन आणि पूर्णपणे वेगळी जबाबदारी येऊन पडली आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (नसबंदी) करणे. रत्नागिरी तालुक्यात सुमारे ३ हजार ८४४ भटक्या कुत्र्यांची अधिकृत नोंद मागील २०२४ च्या पशुगणनेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी, त्यांची नोंद ठेवण्यापासून त निर्बिजीकरणानंतर निवाराशेडची व्यवस्था करण्यापर्यंतची सारी कसरत ग्रामविकास अधिकार्यांच्या माथी मारण्यात आली आहे. विकासकामे करायची की, कुत्र्यांच्या ’ पाठीमागे फिरायचे? असा थेट प्रश्न आता काही ग्रामसेवकांनी उपस्थित केला आहे.www.konkantoday.com



