
कोकण रेल्वे मार्गावर वडोदरा-कोट्टायम स्पेशल २० पासून धावणार
नाताळसह नववर्ष स्वागतासाठी पश्चिम रेल्वेच्या सहकार्यांनी वडोदरा-कोट्टायम स्पेशल २० डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहे. वडोदरा जंक्शन-कोट्टायम स्पेशल २० आणि २७ डिसेंबर, ३ आणि १० जानेवारी रोजी धावेल. वडोदरा जंक्शन येथून संकाळी ६.०५ वाजता सुटेल. दुसर्या दिवशी संध्याकाळी ७.५० वाजता कोट्टायमला पोहोचेल. परतीच्या प्रवासात २१ आणि २८ डिसेंबर, ४ आणि ११ जानेवारी रोजी धावणारी स्पेशल रात्री ९ वाजता कोट्टायमहून सुटेल. तिसर्या दिवशी सकाळी ६ वाजता वडोदरा जंक्शनला पोहोचेल. २१ एलएचबी डब्यांची स्पेशल सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, कुमठा, भायक्कड रोड, मोकळगाव रोड, कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळुरु कासरगोड, कन्नूर, तेल्लीचेरी, कोझिकोड, तिरूर, शोरानूर त्रिशूर, एर्नाकुलम स्थानकांवर थांबणारं आहे.www.konkantoday.com




