
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या केरळच्या प्रवाशाचा चिपळूणमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
पनवेल ते केरळ प्रवासादरम्यान छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी चिपळूण येथे दाखल करण्यात आलेल्या केरळ राज्यातील ५९ वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक १६ डिसेंबर रोजी वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे घडली.
मयताचे नाव उन्नीकृष्णन अयप्पन पी.पी. (वय ५९ वर्षे) असून ते पेराडिपुरथ, मथपल्ली, चाझीयातिरी, ता. चीरुमीडठ्ठाकोड, जिल्हा पालकाड, राज्य केरळ येथील रहिवासी होते. दिनांक १५ डिसेंबर रोजी ते पनवेल येथून केरळकडे प्रवास करत होते. चिपळूण परिसरात आल्यानंतर त्यांना अचानक लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीन चिपळूण रेल्वे स्थानकावर उतरवून प्रथम उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच अधिक उपचारासाठी वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना वालावलकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.www.konkantoday.com




