
काजू बोंडाचा उपयोग आता सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात क्रांती घडवून आणणार
जगप्रसिद्ध रत्नागिरी काजूच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणार्या कोकणातील या जिल्ह्यातून मिळणार्या काजू बोंडाचा उपयोग आता सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्यता आहे. थायलंडमधील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासात काजू बोंडाच्या अर्काला त्वचेच्या वृद्धत्वाला प्रतिबंध करणारा (अँटी-एजिंग) आणि जखमा लवकर भरून काढणारा शक्तिशाली नैसर्गिक घटक म्हणून ओळखले आहे. नेहमी टाकून दिल्या जाणार्या या बोंडाचा आता उच्च मूल्यवान कॉस्मेटिक कच्चा माल म्हणून उपयोग होऊ शकतो. यामुळे स्थानिक शेतकर्यांना नवी आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे.
हा अभ्यास कॉस्मेटिक्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला असून, त्यात काजू बोंडातील व्हिटॅमिन सी, पॉलीफेनॉल्स आणि इतर अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून संरक्षण मिळते, कोलेजन उत्पादन वाढते आणि जखमा लवकर बर्या होतात असे दिसून आले आहे.
www.konkantoday.com



