
आंब्याच्या बाटांपासून तेल व मँगो बटर तयार करण्यास डॉ. ऋषिकेश गुर्जर यांना यश
आंबा खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणार्या बाटांपासून तेल आणि मँगो बटर तयार करण्यात तालुक्यातील खडकवलीचे डॉ. ऋषिकेश गुर्जर यांना यश मिळाले आहे. आंब्याच्या बाटांपासून तयार केलेले हे तेल आणि बटर अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबी स्रोत तर सौंदर्य प्रसाधन उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरणार आहेत.
डॉ. गुर्जर यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे फेकून देण्यात येणार्या बाटाचा पुनर्वापर करून त्याच्या सहाय्याने शाश्वत उत्पादन, स्थानिक उद्योगांची वाढ करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हापूस आंब्याच्या बाटांचा नवीन झाडे निर्मितीशिवाय अन्य पुनर्वापर केला – जात नाही, हे लक्षात घेऊन डॉ. गुर्जर यांनी बाटांवर संशोधन केले आहे त्यात बाटांच्या तेलाचे निष्कर्षण करून गुणधर्म तपासले. त्यानंतर नानकटाई कुकीजमध्ये त्यांनी वनस्पती तुपाऐवजी या तेलाचा बापर केला. बाटापासून मिळणारे तेल शुद्धीकरण केल्यानंतर ते मँगो बटर या स्वरूपात रूपांतरित केले जाते. हे बटर कॉस्मेटिक उद्योगात विशेषतः त्वचा मृदुकारक, लिप बाम लोशन, हेअर क्रीम आणि सोप उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.www.konkantoday.com



