
राजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यासह अनोळखी व्यक्तीना गावात नोएन्ट्री
रायपाटण येथील महिलेचा झालेला खून.. कोळवणखडी येथील झालेली घरफोडी या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नसल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान पूर्व परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गावामध्ये येणारे फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यासह अनोळखी व्यक्तीना गावामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून जर अशा व्यक्ती गावात आढळल्यास तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा देणारे बोर्ड लावण्यात आले आहेत.
रायपाटण येथील श्रीमती वैशाली शेट्ये या महिलेचा खून होऊन दोन महिने लोटले आहेत तर त्यानंतर कोळवणखडी येथे घरफोडीची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त तालुक्याच्या काही भागात घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला कशा प्रकारे आळा घालायचा असा मोठा प्रश्न कायदा सुव्यवस्थेपुढे उभा ठाकला असतानाच आता पूर्व परिसरातील गावागावात जनजागृती होऊ लागली आहे.www.konkantoday.com



