राजापुरात दोन टप्प्यात होणार मतमोजणी

दोन तासांत निकालाचे चित्र स्पष्ट : चोख पोलीस बंदोबस्त

राजापूर : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात रविवारी (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. राजापुरातील दहा प्रभागांतील मतमोजणी दोन टप्प्यांत होणार असून यासाठी पाच टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुढील सहा ते दहा प्रभागातील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी दिली.
आज (१८ डिसेंबर) पत्रकार परिषदेत कशा प्रकारे मतमोजणी होणार आहे त्याची सविस्तर माहिती दिली. दोन टप्प्यात मतमोजणी होणार असल्याने अवघ्या दोन ते अडीच तासांत राजापुरातील निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राजापूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तीन, तर दहा प्रभागांतील २० नगरसेवकपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होत असून, आता साऱ्यांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

राजापुरातील दहा प्रभागांतील मतमोजणी दोन टप्प्यात होणार असून यासाठी पाच टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुढील सहा ते दहा प्रभागातील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन ते अडीज तासात राजापूरातील निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यासाठी मतमोजणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच नगरपालिका इमारत व मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार असून मोबाईल आणण्यास पूर्णपणे प्रतिबंध रहाणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त रविवारी २१ डसेंबर रोजी होणाऱ्या या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडूनही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उपविभागिय अधिकारी सुरेश कदम यांसह राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व अन्य आठ अधिकारी, ११० पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या १०० मीटर परिक्षेत्रात वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
रविवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजापुरात जवाहर चौकात येणारी एसटी वाहतुक सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व सुरक्षिततेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयंत जावडेकर, कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोमीन शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button