खोडदे येथे वाघाची दहशत;वासराला मारले

वन विभागाने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी

वाढत्या जंगलतोडीमुळे वन्य प्राणी मानव वस्तीकडे येत असतानाच गुहागर तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथील माजी पोलीस पाटील आणि प्रगतशील शेतकरी रमाकांत विष्णू साळवी यांच्या चिरेबंदी वाड्यातील अवघ्या सात दिवसांच्या वासराला मध्यरात्री वाड्याचा दरवाजा तोडून वाघाने ठार मारले. या वाड्यात अन्य गुरेही होती; परंतु ती गुरे बांधलेली असली तरी गुरे उधळल्याने वाघाला परतीचा मार्ग गाठवा लागला.
पंधरा दिवस अगोदर एका वासराला जंगलामध्ये वाघाने मारल्याची घटना ताजी असताना बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी खोडदे ग्रामस्थांकडून होत आहे. गुरुवारी पहाटे गाईंचे दूध काढण्यासाठी रमाकांत साळवी आणि त्यांचा मुलगा सर्वेश साळवी हे वाड्यामध्ये गेले असता, चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून वाघाने आतमध्ये प्रवेश करून वासरू ठार मारल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी ग्रामस्थांना व सरपंच पोलीस पाटील तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व वनपाल मांडवकर, प्रथमेश पवार यांना कळवली. दहशतवादी वाघाचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विभागाचे वनपाल मांडवकर, प्रथमेश पवार, खोडदेच्या सरपंच पूजा गुरव, पोलीस पाटील सौ. योगिता पवार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वस्तुस्थिती खरी असल्याचे निदर्शनात आले. जंगलतोडीमुळे वन्यप्राणी मानव वस्ती कडे येत असल्याने वन विभागाने जंगलतोडीवर पण आळा घालावा, याशिवाय वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, मागणी खोडदे गावातून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button