
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पूर्णगड समुद्रात एलईडी नौकेवर केली कारवाई
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी मासेमारीसाठी वापरली जाणारी नौका रविवारी रात्री पकडली. महिन असे या नौकेचे नाव आहे. पूर्णगड समुद्रात ही कारवाई केली. महिन नौका मोहसीन वस्ता यांच्या मालकीची तर हर्षाली मच्छिमार नौका प्रवीण दळवी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.
एलईडी प्रकाशातील मासेमारी बेकायदेशीर असून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनच्या सुधारित नियमानुसार नौका मालकांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत पथकासोबत गस्तीनौकेतून गस्त घालत होत्या. यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पूर्णगड समुद्रात महिन नौकेवर एलईडी लाईट पेटलेले दिसून आले. त्यामुळे या नौकेला ताब्यात घेण्यात आले.www.konkantoday.com




