
सध्या थंडी वाढू लागल्याने केळशी, आतगाव, परिसरात आंब्याला मोहोर, बागायतदारांच्या आशा पल्लवीत
दापोली तालुक्यातील केळशी, आतगांव आंबवली, रोवले आदी परिसरात सद्या मोठ्या प्रमाणात थंडी वाढू लागल्याने आंबा, काजू मोहरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.
आंबवली येथील आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारी श्री. आदित्य महेश केळकर, श्री. डॉ. विश्वास अशोक केळकर, श्री. मनोज केळकर तसेच रोवले आंबेवाडी येथील व्यापारी श्री. परांजपे या गावातील प्रसिद्ध शेतकर्यांचीं झाडे मोहरली आहेत. पुढील काही दिवस अशीच थंडीचे प्रमाण वाढत राहिल्यास मोठ्या प्रमाणात आंबा, काजू मोहरण्यास मदत होईल असे आंबा बागायतदार म्हणाले. यावर्षी परिसरात सततच्या वादळी पावसाने आंबा, काजू तसेच भात आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे मात्र आता आंबा, काजू ही झाडे मोहरायला लागल्याने येथील शेतकर्यांमध्ये समाधान दिसत असून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.www.konkantoday.com




