
राजापूर तालुक्यातील आंगलेत गोठ्यात शिरून बिबट्याकडून गाय फस्त
राजापूर तालुक्यातील आंगले येथे शनिवारी रात्री शेतकर्यांच्या गोठ्यामध्ये घुसून गाय मारल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरात दोन बिबट्या पाळीव कोंबड्यांवर हल्ले करत असून आंगले परिसरातील कांबड्यांवर डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतेच आंगले सरवणकरवाडीतील एकट्या सरवणकर यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये शिरून गाय फस्त केली. इतर जनावरांच्या हंबरड्यामुळे सरवणकर गेले. त्यामुळे बिबट्याने पलायन केले. मात्र इतर जनावरे वाचली. वाडीवस्तीमध्ये वारंवार होणार्या कुत्रे व अन्य प्राण्यांवरील हल्ल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ घराबाहरे पडण्यासही घाबरत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com




