
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या छंदोत्सव २०२५ चा क्रीडा महोत्सवाने प्रारंभ
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्या छंदोत्सव अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शासनदार उदघाटन सोहळा सोमवारी जवाहर क्रीडांगणावर पार पडला.
छंदोत्सव अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उदघाटन समारंभप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष ऍड. विजयराव साखळकर, सहकार्यवाह आणि एमसीव्हीसीचे विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना ×अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, प्रमुख अतिथी श्रीम. ऐश्वर्या सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, छंदोत्सव प्रमुख मकरंद दामले, वरिष्ठ महाविद्यालय कला शाखा विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, परीक्षा नियंत्रण समिती प्रमुख डॉ. विवेक भिडे, कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे विभाग प्रमुख या सर्व क्रीडा महोत्सवाचे नियोजन करणारे प्रा. लीना घाडीगावकर व प्रा. राकेश मालप सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.www.konkantoday.com




