
भाजपचे प्रदेश अध्यक्ष मा रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशी ने रत्नागिरी तालुक्यात विविध कामांसाठी 4 कोटी चा विकास निधी उपलब्ध..
भाजपचे प्रदेश अध्यक्ष मा रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशी ने रत्नागिरी तालुक्यात विविध कामांसाठी 4 कोटी चा विकास निधी उपलब्ध झाला आहे
भारतीय जनता पार्टी चे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष मा रविंद्रजी चव्हाण साहेब यांचेकडे मागणी केली होती.होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विकास निधी आवश्यक आहे असे सांगितले होते, याची तत्काळ दखल मा चव्हाण साहेब यांनी घेतली व मंत्री महोदय ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य मा ना. जयकुमार गोरे साहेब यांच्याशी पत्र व्यवहार करून रत्नागिरी तालुक्यातील विविध 42 कामना 25/15 हेड खाली निधी उपलब्ध करून दिला.. मा चव्हाण साहेब यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी या कामी मोलाची कामगिरी केली..4 कोटीचा ग्रामीण भागात विकास निधी उपलब्ध झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मा रविंद्रजी चव्हाण साहेब मंत्री जयकुमार गोरे…आणि अनिकेत पटवर्धन यांचे आभार मानले.




