
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सलाईनवर
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांना गेले सहा महिने वेतनच मिळाले नसल्याने त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाकडूनच वेळेवर अनुदान न आल्याने ही आर्थिक आपत्ती ओढवली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्याचा आरोग्य विभाग आर्थिकदृष्ट्या व्हेंटीलेटरवर असल्याचे दिसून आले आहे. शसनाकडून वेळेवर अनुदानच आलेले नसल्याने आर्थिक देणे भागवायची कशी, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. कोविड काळातही या वैद्यकीय अधिकार्यांनी आरोग्य सेवेत झोकून दिले होते. कोविडच्या पहिल्या व दुसर्या लाटेत या सेवेकरांची मोठी दमछाक झाली होती. ना घर.. ना सणवार हेच त्यांच्या नशिबी होते. त्यातच लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली. गाव-वाड्यावस्त्यांवर जावून लसीकरण केले. लसीकरणावरून कित्येकांचा रोषही पत्करला, मानसिक त्रास, कामाचा व्याप अशा स्थितीतही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते.www.konkantoday.com




