
अंगणवाडी सेविका करणार लाडकी बहीण योजनेची केवायसी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता कवायसी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत. केवायसीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायचे आहे. अजूनही लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे. जर लाडक्या बहिंणीनी केवायसी केली नाही तर त्यांचा लाभ बंद केला जावू शकतो. दरम्यान केवायसीची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केले आहे. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रोसेस अनिवार्य केली आहे. दरम्यान आता ई केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.
www.konkantoday.com




