
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत समुद्रकिनारी सुरक्षा उपायोजना करण्यात याव्यात -राजू भाटलेकर
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत समुद्रकिनारी सुरक्षा उपायोजना करण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिण जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांनी पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एल. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. भाटलेकर यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री क्षेत्र गणपतीपुळे ता. जि. रत्नागिरी हे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून पर्यटनासाठी फार मोठया वेगाने वाढत आहे. वर्षाला अंदाजे ३० लाख पर्यटक येत असतात. पण श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्यामुळे समुद्रावर पोहण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे आतापर्यंत १५० ते २०० पर्यटकांचे बळी गेले आहेत व काही पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करता गणपतीपुळे समुद्रकिनारी सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे. तात्काळ सुरक्षा उपाययोजना केली नाहीतर पर्यटनावर येणारा मोठा परिणाम दिसून येत आहे. घाबरुन पर्यटक गणपतीपुळे येथे येण्यासाठी दिवसेंदिवस कमी होत आहे व याचा परिणाम पर्यटक व्यवसायावरती सुध्दा होत आहे व लाखो रुपये कर्ज काढून पर्यटक व्यावसायीक अडचणीत आहेत. तरी या सर्व गोष्टींचा गांभिर्याने विचार करता आपण गणपतीपुळे समुद्रकिनारी तात्काळ सुरक्षा उपायोजना कराव्यात अशी मागणी श्री. भाटलेकर यांनी केली आहे.




