
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ८००० शिक्षकांची भरती
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्क्यांप्रमाणे सुमारे आठ हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केले आहे.महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्चपासून शिक्षक भरतीस सुरवात होणार आहे.
सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. दरम्यान, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वड्डेटीवार, भास्कर जाधव, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांवर बोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी केली.




