
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळेत बिबट्याची दहशत, ४ गुरांना केले ठार.
रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळेतील सोनारवाडी जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चरायला सोडलेल्या चार गुरांना ठार केले असून त्यापैकी एका गुराचा फडशा पाडल्याचे उघड झाले आहे. एकाच ठिकाणी ४ गुरांना मारल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
बिबट्यांचा हा हल्ला गेल्या दोन-तीन दिवसांतील असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिरजोळे परिसरासह लगतच्या मुक्त संचार आणि खेडशी भागात बिबट्याच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्या या भागात सातत्याने पाळीव जनावरे आणि कुत्र्यांना लक्ष्य करत आहे.
गुरे जंगलात चरण्यासाठी गेलेली असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. या घटनेची माहिती ग्रामस्थांकडून मिळताच ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप पाटील यांनी तात्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि बिबट्याच्या हल्ल्यात मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आले. त्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे.www.konkantoday.com




