रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे तत्काळ तिकीट विक्री ठिकाणी दगडा खाली मागील १-२ महिन्या पासूनचे फॉर्म भरून ठेवलेले आढळतात.तिकीट काळा बाजार करणारे १-२ मिनिटा पूर्वी आयत्यावेळी येऊन आपले ते फॉर्म भरलेले आहेत असे सांगून पहिल्या नंबर वर तिकीट घेतात व तेथे २-३ तासापासून उभ्या असलेल्या नागरिकाना मागे करतात.सामान्यतः पुढील १/२ नंबर नाच तत्काळ तिकीट उपलब्ध होऊ शकतात.ही काळ्या बाजारातील तिकिटे मग चढ्या भावाने विकली जातात.(तत्काळ एसी तिकिट दरापेक्षा ₹४०० जास्त दर) व असे एजेंट रत्नागिरी मधे आहेत.
उपस्थित नागरिकांनी आवाज उठवला तर रेल्वे तिकीट कर्मचारी त्रेल्वे पोलिस बोलवून या नागरिकास दमात घेतात.वास्तविक कर्मचाऱ्यांनी हा काळाबाजार थांबवणे जरुरी आहे परंतु हे कर्मचारी काळ्या बाजारला सहाय्य करतात असा आरोप भाजप पदाधिकारी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे निदर्शनास आणून दिले व याबाबत रेल्वे मंत्र्यांनाही कळवणार असल्याचे सांगितले.
हा काळाबाजार जर थांबला नाही तर रेल्वे स्थानकबाहेर येऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असे शिष्टमंडळाने RRM याना इशारा दिला या वेळी श्री.सतेज नलावडे,श्री.दीपक आपटे,श्री.नितीश अपकरे,श्री.योगेश गराटे इत्या. हे उपस्थित होते.