
रत्नागिरीचे माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धाजिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा (इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी)
स्पर्धेचा दिनांकः- बुधवार दि.07 जानेवारी 2026 वेळ :- सकाळी १० वाजता
स्थळ:-सह्याद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ता. चिपळूण
विषय–
(१) घरात हवेत आजी आजोबा (२) सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम
पारितोषिक
प्रथम क्रमांक – रोख रू ५०००/-, चषक व प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक- रोख रू ३०००/-, चषक व प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक- रोख रू २०००/-, चषक व प्रमाणपत्र.
सर्वसामान्य नियम व अटी – (१) सदर स्पर्धा केवळ मराठी भाषेतच होईल. (२) प्रत्येक स्पर्धकास आपले विचार मांडण्याकरिता ५+२ मिनिटांचा कालावधी असेल. (३) सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांच्या सहीसह प्रवेशिका जमा करणे आवश्यक आहे. (४) स्पर्धकांनी प्रवास खर्च स्वतः करावयाचा आहे. (५) स्पर्धा वेळेवर सुरू होईल. (६) स्पर्धा सुरू असताना प्रत्येक स्पर्धकाने सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.(७) स्पर्धेसाठी एका शाळेतील केवळ दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
संपर्क :- (१) रसिका सुर्वे (८३६९७६२३९७) (२) प्रणित राजेशिर्के ( ८४११०६६८७२)
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा (इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी) – –
स्पर्धेचा दिनांक-बुधवार दि.07जानेवारी 2026
वेळ :- सकाळी ११ ते १२
विषय: – (१) इतिहासातील स्त्री व आजची स्त्री
(२) संगणक साक्षरता-काळाची गरज
पारितोषिक
प्रथम क्रमांक – रोख रू ५०००/-, चषक व प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक-रोख रू.३०००/ – , चषक व प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक- रोख रू २०००/-, चषक व प्रमाणपत्र.
स्पर्धेचे ठिकाणः– सह्याद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ता. चिपळूण
स्पर्धेचे स्वरूप :- सदर स्पर्धा जिल्हास्तरीय आहे. स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांकडून निबंध लिहून घेतले जातील.
सर्वसामान्य नियम व अटी:- (१) निबंध मराठी भाषेत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा. (२) निबंध सुवाच्च अक्षरात लिहिलेला असावा. (३) निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका व खाडाखोड टाळावी. (४) लेखनासाठी निळ्या किंवा काळ्या रिफीलच्या बॉलपेनचा वापर करावा. (५) निबंध लेखनासाठी कागद आयोजकांकडून देण्यात येतील. (६) निबंध पाठपोट लिहू नये. (७) निबंधाचे लिखाण विषयानुरूप असावे. विषयबाह्य लिखाणाचा विचार करण्यात येणार नाही. (८) स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. (९) निबंध किमान २५० ते ३०० शब्दांचा असावा. (१०) प्रवेशिकांमधील निबंध प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल. याबाबत भविष्यात स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही.(११) निबंधांची तपासणी तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात येईल. (१२) स्पर्धेच्या नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील. (१३) स्पर्धेचा निकाल विजेत्यांना कळविण्यात येईल. (१४) बक्षीस वितरण समारंभासाठी विजेत्यांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. (१५) शाळेतील कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
संपर्क :-
(१)प्रणिता दिंडे ९०४९११५७६५
(२) अक्षता घाग ९६८९७९२९३० बक्षीस वितरण समारंभ :- या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. 17 जानेवारी 2026 रोजी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांच्या स्मारकस्थळी सावर्डे ता. चिपळूण येथे होईल.




