
पाली शाळा क्र. १ ने सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत मिळवले विजेते पद
पाली जि. प. अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील पाली केंद्राच्या यंदाच्या शैक्षणिक हिवाळी क्रीडा स्पर्या नुकत्याच जि. प. प्राथमिक शाळा पाली क्र १ च्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत पाली केंद्रातील जि. प. आदर्श प्राथमिक शाळेने सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारात केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावत यश संपादन केले आहे.
या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनाला पाली माजी सरपंच रामचंद्र गराटे, उपसरपंच संतोष धाडवे, वळके सरपंच उत्तम सावंत, साउरे सरपंच तृप्ती पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश शिदे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे ऍड. सागर पाखरे, तंटामुक्त अध्यक्ष सचिन सावंत, केंद्रप्रमुख विष्णु पवार, पालक व मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे-मोठा गटः कबड्डी मुलगे विजेता पाली क्र. १, उपविजेता साठरे क्र. २. मुली विजेता पाली क्र. १, उपविजेता कापडगाव क्र. १.
खो-खोत विजेता कापडगाव क्र. १, उपविजेता पाली क्र १, मुलींमध्ये बळके शाळा प्रथत मर उपविजेता पाली क्र. १, लंगडी मुली विजेता कापडगाव क्र. १, उपविजेता पाली क्र. १, शंभर मीटर धावणे मुले प्रथम कार्तिक भोसले-पाली क्र. १. द्वितीय हर्ष तेरेकर साठरे क्र. २, मुली प्रथम तीर्था भुवड, शाळा-वळके, द्वितीय सृष्टी कुरतडकर, कापडगाव क्र. १. लांबउडी प्रथम हर्ष धाडवे पाली क्र १. द्वितीय सार्थक पेजे कापडगाव क्र. १, मुलीमध्ये प्रथम तीर्था भुवड, द्वितीय श्रेया सावंत-वळके शाळा, उंचउडी मुलगे प्रथम अंश कोत्रे, द्वितीय रुद्र कोत्रे, मुली प्रथम ऋता कुरतडकर, द्वितीय सांज पेजे सर्व कापडगाव क्र. १, थाळीफेकमध्ये प्रथम गौरव पांचाळ तर द्वितीय हर्ष धाडवे. मुली प्रथम अवंतिका हट्टीहोली, द्वितीय पवित्रा वाघमोडे, सर्व पाली क्र. १. गोळाफेक मुलांमध्ये प्रथम आदित्य साळवी, कापडगाव क्र. १, द्वितीय गौरव पांचाळ-पाली क्र. १, बुद्धिबळ मुलांमध्ये प्रथम समर्थ सावंत साठरे क्र. २. मुलींमध्ये अवंतिका हट्टीहोळी प्रथम आली.www.konkantoday.com




