ठाकरे शिवसेनेतर्फे भारतातील कमी वयाची जलतरणपटू वेदा सरफरेचा सत्कार


भारतातील कमी वयाची जलतरणपटू इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झालेली रत्नागिरीतील १ वर्ष ९ महिने दहा दिवसांची वेदा परेश सरफरे हिचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर व रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सत्कार करण्यात आला.

वेदा हिने १०० मी अंतर अवघ्या १० मिनिटे ८ सेकंदामध्ये पार करून जागतिक विक्रम केला. त्याबद्दल तिचा ठाकरे शिवसेना रत्नागिरी तालुका पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, युवासेना तालुकाअधिकारी संदेश नारगुडे, भावी नगराध्यक्षा सौ. शिवानी सावंत-माने, ज्येष्ठ नगरसेविका सौ. रशिदा गोदड, श्रीमती राजश्री लोटणकर, पूजा जाधव, उपतालुकाप्रमुख सुभाष रहाटे, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख किरण तोडणकर, नयन साळवी, मयुरेश पाटील, शशिकांत बारगोडे, उमेश राऊत, उपविभागप्रमुख राजेश सुर्वे, सचिन सावंतदेसाई, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक सुर्वे, जयंत जोशी, जीवन कोळवणकर, पंकज पुसाळकर, अनिल कांटे, मनोज सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button