
कोकणातील नारळ उत्पादकांना दिलासा, स्वच्छ नारळ रोप कार्यक्रम विस्तारित करण्याचा निर्णय
कोकणातील नारळ उत्पादनाला सध्या गंभीर धोका निर्माण झाला असताना, केंद्र सरकारने या पिकाला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, नारळ बागांवर हल्ला करणार्या गंभीर जंतू आणि रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छ नारळ रोप कार्यक्रम विस्तारित करण्यात बेत आहे. सरकारचे हे पाऊल रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यांतील शेतकर्यांसाठी आशादायी ठरणार आहे. भारत जगातील सर्वाधिक नारळ उत्पादक देश असून, दक्षिण भारतातून सुरू झालेल्या या समस्या आता कोकणातही पसरल्या आहेत. चौहान यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तर सत्रात सांगितले, नुकत्याच वाढलेल्या राइनोसेरॉस बीटल (गेडा), रेड पाम विहेल (लाल खजूर अळी), रूट विल्ट आणि गॅनोडर्मा रोगांमुळे नारळ बागा धोक्यात सापडल्या आहेत.
सरकार या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे नारळ विकास मंडळ स्वच्छ नारळ रोपे तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण सध्या ही संख्या अपुरी आहे. आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कोकण पट्टधातील रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १.५ लाख हेक्टर क्षेत्रावर नारळ बागा असून त्या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र, येथेही राइनोसेरोस बीटल, रेड पाम विहेल, लीफ इटिंग कैटरपिलर (पान खाणारी अळी), एरियोफिड माईट आणि व्हाईट ग्रबसारखे जंतू तसेच स्टेम ब्लीडिंग रोग सक्रिय आहेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, रत्नागिरीतील बागांमध्ये या जंतूंचा सरासरी प्रादुर्भाव २०-३० टक्के असून, अनावर्षकीय भागात हा धोका अधिक आहे.www.konkantoday.com




