
राष्ट्रीय लोक अदालत : चिपळूण जिल्हा न्यायालयात4 कोटी 18 लाखाहून अधिक रक्कमेची वसुलीसलग 10 राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 21 कोटीहून अधिक उल्लेखनीय वसुली
रत्नागिरी, दि. 15 ):- जिल्हा न्यायालय चिपळूण येथे जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालयातील व तालुका विधी सेवा समितीची एकूण प्रलंबित प्रकरणे 732 व 1 हजार 535 वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. 732 पैकी 139 प्रकरणे निकाली होवून दिवाणी व फौजदारी प्रकरणात 4 कोटी 4 लाख 32 हजार 528 रुपये रक्कमेची तडजोड झाली. तसेच वादपूर्व प्रकरणात 233 प्रकरणे निकाली होवून 14 लाख 2 हजार 101 रुपये इतक्या रक्कमेची तडजोड होवून वसुली झाली. जिल्हा न्यायालयाने गेल्या अडीच वर्षात सलग 10 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आत्तापर्यंत 21 कोटीहून अधिक रक्कमेची उल्लेखनीय वसुली केली आहे.
यावेळी विविध बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, इतर वित्तीय संस्था, नुकसान भरपाईचे अर्ज तसेच कौटुंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यासाठी न्यायाधीश वकिलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. या लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश के. ए. पोवार, सह दिवाणी न्यायाधीश वाय. सी. पाटील तसेच पॅनल विधीज्ञ एन. एस. सावंत, एन.जी.लाड व श्रीमती एन.यू.पवार यांनी काम पाहिले.
लोक अदालतमध्ये पक्षकार व वकीलवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होवून महत्त्वाची भूमिका पार पाडली. लोक अदालतीमध्ये 732 पैकी 139 प्रकरणे निकाली होवून, दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण 4 कोटी 4 लाख 32 हजार 528 रुपये इतक्या रक्कमेची तडजोड झाली तसेच वादपूर्व प्रकरणात 233 प्रकरणे निकाली होवून रक्कम रुपये 14 लाख 2 हजार एकशे एक इतक्या रक्कमेची तडजोड होवून वसुली झाली. या लोकअदालतीमुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला. लोकलदालतीकरिता चिपळूण वकील संघ, वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यानी उपस्थित राहून तालका विधी सेवा समिती, चिपळूण यांना सहकार्य केले. विधी सेवा समिती अध्यक्ष डॉ. अनिता एस. नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.
चिपळूण जिल्हा न्यायालयाचे गेल्या अडीच वर्षात सलग राष्ट्रीय 10 लोकअदालतीमध्ये आत्तापर्यंत 21 कोटीहून अधिक रक्कमेची उल्लेखनीय वसुली केली आहे.



