
रत्नागिरीत विद्यार्थ्यांचा सहलींसाठी एसटी बसेसना मोठा प्रतिसाद.
वर्ष अखेरीस शालेय विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात येत असतात. जिल्ह्यात देखील एसटी बसेसना मोठा प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत २०१ बसचे बुकुंग करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलींवर झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल २२४३ गाड्या राज्याच्या विविध आगारातून देण्यात आल्या. यातून महामंडळाला १० कोटी ८५ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. शासनाने एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शालेय सहलीचा अनुभव घेता येतो. एसटीच्या ३१ विभागांपैकी कोल्हापूर विभागाकडे ३७५ एसटी बस शालेय सहलींसाठी उपलब्ध करून देवून सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत १ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. त्यानंतर सांगली २११ व रत्नागिरी २०१ यांनी चांगली कामगिरी केली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी कोर्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे महामंडळाकडून नियोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




