
नाताळसाठी नवीन वर्षाच्या काळात विसापूर-मडगांव स्पेशल २० डिसेंबरपासून
नाताळसह नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आग्नेय मध्यरेल्वेच्या समन्वयाने २० डिसेंबरपासून बिलापसूर-मडगांव साप्ताहिक स्पेशल धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. १४ रोजी स्पेशलचे आरक्षण खुले होणार आहे.
बिलासपूर-मडगांव एक्सप्रेस स्पेशल बिलासपूरहून दर शनिवारी २० ते २७ डिसेंबर, ३ व १० जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजता सुटेल, तिसर्या दिवशी मध्यरात्री २.१५ वाजता मडगांव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात २२ व २९ डिसेंबर ५ व १२ जानेवारी रोजी दर सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुटून दुसर्या दिवशी सायं. ४ वाजता बिलासपूरला पोहोचेल. १८ एलएचबी डब्यांची स्पेशल कल्याण-पनवेल, पेण, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड राजनांदगाव रोड, रामपूर येथे थांबेल.
www.konkantoday.com




