
चिपळूण दसपटीतील दोन पुलांची पुर्नबांधणीची कामे अद्याप सुरू न झाल्याने राष्ट्रवादी आक्रमक
चिपळूण दसपटीतील पिंपळी-नांदिवसे मार्गावरील पिंपळी येथील दोन्ही पुलांची निविदा काढूनही त्याची पुनर्बाधणीची कामे अद्याप सुरू न झाल्यामुळे १६ गावातील नागरिक, कामगार विद्यार्थी व रुग्णांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यां संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी एमआयडीसीच्या मुख्य अभियंत्यासह संबंधित प्रशासनाला निवेदन देत २४ डिसेंबर रोजी परिसरातील जनता, कामगारांना घेऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या मार्गावरील पिंपळी येथील पूल २३ सप्टेंबर रोजी कोसळल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दसपटीकडे जाणारा हा मार्ग गाणेखडपोली औद्योगिक वसाहतीतील शेकडो कामगार, विद्यार्थ्यांचे रोजचे प्रवासाचे साधन असून औद्योगिक वाहतुकीसाठीही महत्वाचा आहे. वाढलेल्या अंतरामुळे नागरिकांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे.www.konkantoday.com



