
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीमध्ये मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर
उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर याच्या वतीने शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १ ह्या वेळेत मोफत आरोग्य शिबीर होत आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी आरोग्य शिबिराचे संयोजन केले आहे.
लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट व पित्ताशयातील खडे तपासणी व ऑपरेशन शिबीर आयोजित केले आहे,व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिला मध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की गर्भधारणा, रजोनिवृत्ती ह्या काळात जास्त प्रमाण असते, पॉवरलूम वर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे, ड्राइवर, कंडक्टर, नाभिक, किराणा दुकानदार, इस्त्री व्यवसायक ह्यांना जास्त प्रमाणात आढळतो तसेच मुतखडा लक्षणे लघवीला अडथळा होणे,लघवीत रक्तस्त्राव होणे,लघवीला घाई होणे,किडणीचे कार्य मंद होणे,मुतखडा,पाठीकडून पोटात दुखणे,थेंब थेंब लघवी होणे,लघवी करताना जळजळ होणे.तसेच प्रोस्टेट लक्षणे लघवीची धार कमी होणे,लघवीची धार रोखता न येणे,रात्रीला लघवी वारंवार होणे,लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होणे,लघवी करतांना त्रास वाटणे व संपूर्ण झाली नाही असे वाटणे, लघवी बंद होणे,अरुंद मूत्र मार्ग,लघवीतून रक्त जाणे किंवा लघवी लालसर होणे,लघवीला जोर करावा लागणे वरील सर्व लक्षणे असणारे रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकतात शिबिरास येताना आपले सर्व जुने रिपोर्ट्स, सोनोग्राफी, पायाचा कलर डॉपलर रिपोर्ट घेऊन येणे तसचे येताना ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे, नाव नोंदणीसाठी ८९२८७३६९९९ ह्या वर संपर्क करावा वरील सर्व मोफत ऑपरेशन अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर मध्ये करण्यात येतील तरी जास्तीत जास्त रत्नागिरी मधील लोकांनी रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्दकीय मदत कक्ष मार्फत केले आहे.




