
रत्नागिरी शहरा जवळील खेडशी येथे रिक्षा दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ, राधाकृष्ण ग्रेनाईडसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ॲक्सेस दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा-टेम्पोला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेले अन्य दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात दुचाकी चालवणारा राज सुधाकर कोत्रे (वय १९, रा. कापडगाव) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दुचाकीवर असलेले त्याचे सहकारी आर्यन विनोद कुरतडकर (१९) आणि पार्थ विजय कुरतडकर (१९, तिघेही राहणार कापडगाव, रत्नागिरी) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
निवळीकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा-टेम्पो (एमएच ०८ बीसी १२७९) रात्री सुमारे ९.२० वाजता खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळून जात असताना, समोरून येणाऱ्या ॲक्सेस दुचाकीने (एमएच ०८ एडब्ल्यू १६६२) तिला धडक दिली. अपघातग्रस्त ॲक्सेस दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते.




