
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल
राज्याचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना शनिवारी रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यामुळे ते आज सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, युरीन स्टोनच्या तीव्र वेदनांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू त्यांची प्रकृती स्थिर आहे




