
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे रस्ता रूंदीकरणासाठी शौचालय हटले, पण नागरिकांना दुसरा पर्याय नाही.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असताना लांजा शहरातील भूमिअभिलेख कार्यालयासमोर काही वर्षापूर्वी उभारण्यात आलेले निर्मल शौचालय रस्त्याच्या विस्तारात अडथळा ठरत असल्याने ते नुकतेच पाडण्यात आले. या शौचालयामुळे नागरिकांची दीर्घकाळ जावणत असलेली असुविधा दूर झाली होती. मात्र आता ते हटविल्याने पुन्हा एकदा नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी शहरात येतात. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, भूमिअभिलेख कार्यालय, शासकीय ग्रामीण रूग्णालय, एसटी स्थानक, तसेच विविध बँकांमध्ये कामे उरकण्यासाठी नागरिकांना वारंवार लांजात येणे अपरिहार्य असते. अशा वेळी सार्वजनिक शौचालयाच्या सुविधेचा अभाव मोठी गैरसोय निर्माण करणारा ठरतो.
www.konkantoday.com



