पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत कुडप येथील साक्षी जड्याळचे सुयश


पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळ या धावपटूने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये (४२.१९५ कि.मी.) सहभागी झघली आणि जिंकलीही. तिच्या या यशाने चिपळूण तालुक्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव झळकले आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एरवी पुण आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हटले की, आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व पहायला मिळते. मात्र महिलांच्या मॅरेथॉनमध्ये या वर्चस्वाला रविवारी धक्का बसला. महाराष्ट्राच्या चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. सणस क्रीडांगणापासून रविवार दि. ७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. गेल्या वर्षी साक्षीने पुणे मॅरेथॉनमधील हाफ मॅरेथॉन जिंकली होती. यावेळी ती जिद्दीने ४२.१९५ कि.मी. अंतराच्या शर्यतीत सहभागी झाली. यासाठी तिने गेल्या दोन तीन महिन्यांपासून सातार्‍यात कसून सराव केला होता. या मेहनतीचे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी चीज झाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button