
’निवळी-मिर्या’ पाणी योजना रखडण्याची शक्यता, ६५ टक्के काम पूर्ण परंतु उर्वरित कामासाठी निधी नाही
रत्नागिरी तालुक्यातील २४ ते २५ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या निवळी-मिर्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कामाला निधीच्या तीव्र कमतरतेमुळे मोठा ब्रेक लागला आहे. आतापर्यंत जवळपास ६५ टक्के काम पूर्ण झाले असले तरी, उर्वरित महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीअभावी अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम आणि कॉंक्रीटची कामे थांबली आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न करून १६० कोटींची ही योजना मंजूर करून आणली होती. या योजनेसाठी बावनदीवर ’कोल्हापूर टाईप-२० चे दोन बंधारेही मंजूर करण्यात आले आहेत. त्यांची कामेही सध्या सुरू आहेत. तालुक्यातील महामार्गालगतच्या गावांसह रत्नागिरी शहरालगतच्या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने या योजनेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे आणि पाईपलाईनचे काम झाले आहे.
www.konkantoday.com




